Attempt to burn Shiv Sena MLA Sanjay Gaikwad's car
बुलडाणा : बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची इनोव्हा कार जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टू व्हीलरवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी जाळण्याचा प्रयत्न केला. पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.
संजय गायकवाड रात्री दीड वाजता मुंबईहून घरी परत आले. त्यानंतर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास टू व्हीलरवर आलेल्या अज्ञात व्यक्तींनी येऊन इनोव्हाच्या पेट्रोल टॅंकजवळ पेट्रोल टाकून गाडी पेटवून दिली. या कारच्या मागे आणि पुढे चार ते पाच गाड्या उभ्या होत्या. त्यामुळे ही वाहने पेटली असती तर मोठ्या दुर्घटनेची शक्यता होती. दरम्यान, हे कृत्य करताना या अज्ञात व्यक्तींनी या परिसरातील विद्युतपुरवठा देखील तोडला होता, अशी माहिती मिळाली आहे.
संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. सकाळी घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तपास सुरू केला आहे. तर श्वान पथकही घटनास्थळी पोहोचले होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…