मनोरंजन

सलमानने केआरके विरोधात दाखल केला मानहानीचा खटला, केआरकेने अगोदर खिल्ली उडवली, पण नंतर…

मुंबई : चित्रपट अभिनेता कमाल राशिद खानला (केआरके) सलमान बरोबर पंगा घेणं महागात पडलं आहे. आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत राहणारा कमाल खान याच्यावर सलमान खान प्रचंड संतापला असून त्याने केआरके विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. सलमानचा ईदच्या मुहूर्तावर अलीकडेच रिलीज झालेला ‘राधे योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या चित्रपटाची समीक्षा करताना केआरकेने सलमानची खूप खिल्ली उडवली होती.

केआरके अनेकदा बॉलिवूड चित्रपट आणि गाण्यांची समीक्षा (Review) करून स्टार्सची खिल्ली उडवत असतो, पण आता केआरके सलमान बरोबर पंगा घेऊन चांगलाच अडचणीत सापडला आहे. सलमानने त्याच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे.

पहिल्यांदा तर केआरके सलमान बरोबर भांडण्याच्या अविर्भावात दिसला. त्याने ट्विट करत म्हटले कि, “प्रिय सलमान खान, हे मानहानी प्रकरण तुमच्या हताश आणि निराश असण्याचा पुरावा आहे. मी माझ्या फॉलोअर्ससाठी समीक्षा करतो आणि मी माझे कार्य करीत आहे. मला समीक्षा करण्यापासून रोखण्याऐवजी आपण एक चांगला चित्रपट बनवायला हवा. मी सत्यासाठी लढत राहणार आहे. या केससाठी धन्यवाद.”

पण नंतर त्याला समजले की सलमानचा सामना करण्यात आपले नुकसान होऊ शकते. त्यामुळे त्याने नंतर सूर बदलला. त्याने सलमानचे वडील सलीम खान यांना विनंती केली की त्यांनी सलमानची समजूत काढावी आणि त्याला ही केस मागे घ्यायला सांगावी. तो यापुढे सलमानच्या चित्रपटांची समीक्षा करणार नाही आणि त्यांचे सर्व व्हिडिओ काढून टाकेल.

केआरकेने ट्विटमध्ये लिहिले कि, “सलीम खान सर मी सलमानच्या चित्रपटाला आणि त्याच्या कारकिर्दीला नुकसान पोहोचवत नाही. मी फक्त मनोरंजनासाठी समीक्षा करतो. पण त्यामुळे सलमानवर परिणाम झाला आहे हे मला माहित असतं, तर मी समीक्षा केली नसती. जर त्याने मला चित्रपटाची समीक्षा न करण्यास सांगितले असते तर मी समीक्षा केली नसती. कृपया त्यांना सांगा की हा खटला पुढे नेऊ नका. मी यापुढे सलमानच्या चित्रपटांची समीक्षा करणार नाही आणि तुम्ही म्हणत असाल तर त्यांचे सर्व व्हिडिओ काढून टाकेल.”

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago