ST Corporation
लातूर : शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेण्याची धक्कादायक घटना घडली. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकातील ही घटना आहे. गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा एसटी बस नव्हती म्हणून बस स्थानकातून एसटी पळवून नेण्याचा प्रकार घडला.
रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्यानं दारूच्या नशेत शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली. एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना देखील जोराची धडक बसली. त्यामुळे विजेच्या तारा तुटून खाली पडल्या. शिवाय विजेचा खांब देखील कोसळला आहे. पहाटेच्या सुमारास बस स्थानकात झोपलेल्या बसच्या चालक आणि वाहकाला एसटी जाग्यावर नसल्याचं समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले.
औराद पोलिसांनी शोध घेतल्यानंतर शेळगी गावात एसटी बस सापडली. तरुणांनी एसटी बस पळवून नेताना झालेल्या अपघातामुळे एसटीचं २५ हजारांचं नुकसान झालं आहे. मात्र, एसटी खात्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात नसल्यानं गुन्हाच नोंद झालेला नाही. एवढा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर एसटी विभागाकडून गुन्हा नोंदवण्यात आला नाही. एसटीचा गलथानपणा या निमित्तानं चव्हाट्यावर आला आहे. नेमकी एसटी कोणी पळवून नेली? एसटी पळवणाऱ्यांना पोलीस प्रशासन व एसटी खातं पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतंय का, या प्रश्नाची चर्चा परिसरात रंगली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…