Touching the cheeks of children without the intention of sexual abuse is not a crime under 'Pokso'!
मुंबई : लैंगिक शोषणाच्या हेतूशिवाय लहान मुलांच्या गालांना स्पर्श करण ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा नाही असं स्पष्ट करत मुंबई सत्र न्यायालयानं एका आरोपीला पोक्सोतून दोषमुक्त केलं. मात्र याच प्रकरणात मुलीच्या आईचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला एक वर्षाची कैद आणि 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. या 28 वर्षीय आरोपीचं वय आणि पहिलाच गुन्हा असल्यानं त्याला सुधारण्याची संधी देत असल्याचं यावेळी कोर्टानं स्पष्ट केलं. दुपारच्यावेळी घरात इलेक्ट्रिशियनचं काम करण्यासाठी आलेल्या इसमानं अतिप्रसंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला होता.
घटना घडली तेव्हा ती मुलगी चार वर्षांची होती. या खटल्याच्या सुनावणी दरम्यान तिचीही साक्ष नोंदवण्यात आली. मात्र या सात वर्षीय मुलीनं आपल्याला काहीही आठवत नसल्याचं कोर्टाला सांगितलं. त्यामुळे महिलेच्या जबानीवरून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टानं आरोपीला वियनभंगासाठी दोषी ठरवलं.
काय आहे प्रकरण?
एका उच्चभ्रू इमारतीत 33 वर्षीय महिलेच्या घरातील फ्रिज बिघडला होता. म्हणून तिनं वॉचमनला सांगून इमारतीच्या इलेक्ट्रिशियनला घरी पाठवण्यास सांगितले. त्यानुसार हा आरोपी इलेक्ट्रिशियन घरी आला. फ्रिजचा पार्ट बदलावा असं सांगून थोड्यावेळानं तो पुन्हा आला. त्यावेळी महिला आपल्या दोन अल्पवयीन मुलींसोबत घरात एकटीच होती. अचानक या इसमानं एका लहान मुलीच्या गालाला स्पर्श केला. त्यावर महिलेनं त्याला हटकलं आणि दम दिला. त्यानंतर घरातील वॉशिंग मशिनही खराब असल्यानं तिही चेक करण्यास सांगितलं. तेव्हा तो इलेक्ट्रिशियन आत गेला. त्यानंतर अचानक पाठीमागून येऊन त्यानं महिलेला मिठी मारली. यावर ती महिला चटकन मागे झाली, तिनं इलेक्ट्रिशियनचे पैसे दिले आणि त्याला घरातून बाहेर काढलं. जाता जाता पुन्हा या आरोपीनं लहान मुलीच्या गालाला स्पर्श केला. महिलेनं तातडीनं आपल्या घरच्यांना आणि इमारतीच्या व्यवस्थापकांना याची तक्रार दिली. त्यानंतर रितसर पोलीस तक्रार देत या आरोपीला अटक करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी त्याच्यावर महिलेचा विनयभंग आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…