महाराष्ट्र

दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख जाहीर, वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी बोर्ड परीक्षा २०२२ साठी दहावीच्या (SSC) परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची तारीख जाहीर केली आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर वेळापत्रक शेअर केले आहे. त्या म्हणाल्या कि, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या 10वीच्या परीक्षांचे अर्ज 18 नोव्हेंबरपासून http://mahahsscboard.in वर ऑनलाइन घेतले जातील. ”

इयत्ता १० वीच्या राज्य बोर्ड परीक्षेच्या नियमित विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रिया 18 नोव्हेंबरपासून 9 डिसेंबरपर्यंत असेल, तर विलंब शुल्क अर्ज 20 डिसेंबर ते 28 डिसेंबरपर्यंत. उमेदवार गुरुवारपासून अधिकृत वेबसाइटवरून अर्ज डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र राज्य मंडळाने पुनर्परीक्षा, खाजगी उमेदवार, तसेच आयटीआय विद्यार्थ्यांसाठी १० डिसेंबर ते २० डिसेंबरपर्यंत अर्ज प्रक्रिया आमंत्रित केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

3 महिने ago