अहिल्यानगर

बारावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

अहमदनगर : बारावी परीक्षेचा पेपर देऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. नगर-जामखेड रस्त्यावर सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. सागर बबन लष्करे (रा. गोरेगाव, ता. पारनेर) व किरण बाबासाहेब ठुबे (रा. कान्हूरपठार, ता. पारनेर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत.

बारावीचा पेपर देऊन पारनेर तालुक्यातील दोन विद्यार्थी आष्टी येथून त्यांच्या दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी नगर-जामखेड रस्त्यावर असलेल्या एका हॉटेलच्या समोर ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक घेऊन घटनास्थळावरून फरार झाला. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तात्काळ या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर भिंगार कॅम्प पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

4 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

4 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago