पुणे

पुण्यात घरफोडी करणा-या आंतरराज्य टोळीस मार्केटयार्ड पोलीसांकडून अटक

पुणे : पुणे शहरामध्ये घरफोडी करणा-या आंतरराज्य टोळीस मार्केटयार्ड पोलीसांनी अटक केली आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये विविध कलम लावण्यात आलेले अनोळखी आरोपी सोनीया अपार्टमेंट, चाफळकर कॉलनी, मार्केटयार्ड, पुणे येथे घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत असताना तेथे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यातील आरोपीतांनी सोसायटीचे वॉचमन आणि पोलिसांच्या अंगावर त्यांच्या बॅगमधील दगड-विटा फेकुन मारल्या, तसेच पोलीसांच्या अंगावर शस्त्रानिशी धावुन जावुन कोयता फेकुन मारुन अंधाराच्या दिशेन पळुन गेले याबाबत आरोपींवर गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा घडल्यानंतर संबंधित आरोपी हे जनता वसाहत, पर्वती पुणे येथे गेल्याचे दिसुन आले. या परिसरामध्ये मार्केटयार्ड पोलीस स्टेशन तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी दिवसरात्र पाळत ठेवुन होते, यावेळी यातील आरोपी नवलसिंग अजम अलावा (वय 40, रा.नरवाली, तहसील कुकशी, जि.धार, मध्यप्रदेश), भाया भांगु
देवका (वय 32, रा.तरसिंगा, तहसील कुकशी, मध्यप्रदेश) आणि विनोद रमेश सिसोदिया (वय 19, रा. तरसिंगा, मध्यप्रदेश) हे जनता वसाहत येथील कॅनॉलवर आल्याचे दिसुन आले. त्यानंतर त्यांचा अत्यंत धाडसाने पाठलाग करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी त्यांच्याकडून घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे जसे, लोखंडी कटर, स्क्रु ड्रायव्हर, लोखंडी पाना, टॉमी व ३० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागीने जप्त केले आहेत. तसेच या आरोपींनी सिंहगड रोड परिसरात देखील भा.द.वि. कलम 454,457,380 अन्वये गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पुणे शहर यांच्या सुचनेनुसार पोलीस उप-आयुक्त नम्रता पाटील, परिमंडळ 05, पुणे शहर, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र गंलाडे, वानवडी विभाग, पुणे शहर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, मार्केटयार्ड पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सविता ढमढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार हिरवाळे, किरण जाधव, महेश जाधव, आशिष यादव, स्वप्नील कदम, संदीप सुर्यवंशी, लोणकर, गायकवाड, शेख, घुले यांच्या
पथकाने केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

5 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

5 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

6 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago