अहिल्यानगर

मुंबई काय राज्‍यापासून वेगळी आहे का? भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र

अहमदनगर : भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. त्यानंतर राधाकृष्ण विखे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर जोरदार टीका केली. महाविकास आघाडीत स्‍वत:ची निर्णयक्षमता दिसून येत नाही. महाविकास आघाडी सरकार मुंबईपुरते निर्णय करीत आहे. त्याचबरोबर सरकारने टास्‍क फोर्सने सुचविलेल्‍या सुचनांचा फेरविचार करावा, असेदेखील विखे पाटील यांनी म्हटले आहे.

राधाकृष्ण विखे यांच्या पाठोपाठ त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्या सर्वांनी नगरमधील त्यांच्याच संस्थेच्या रुग्णालयात उपचार घेतले. दरम्यान, कोरोनामुक्त झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले, राज्य सरकारने निर्बंधांसोबतच उपाय सुद्धा सुचविले पाहिजेत. सरकार केवळ मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून निर्णय करत आहे. सरकारने राज्‍यातील इतर जनतेचाही विचार करावा. राज्‍यात एकीकडे नियम लादायचे आणि मुंबई मात्र सर्रासपणे सुरू ठेवायची. मुंबई काय राज्‍यापासून वेगळी आहे का? केवळ महानगरपालिकेच्‍या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी सरकार मुंबईपुरते निर्णय करीत आहे. सरकारने राज्‍यातील अन्‍य भागातील नागरिकांचाही विचार केला पाहिजे. मुंबईमध्‍ये ५०० चौरस फूटांपर्यंतच्या घरांचा कर माफ करताना राज्‍यातील इतर जनतेलाही त्‍याचा लाभ मिळू द्यायला हवा. कोरोना संकटात राज्‍यातील तीर्थक्षेत्रांच्‍या परिसरातील छोटे व्‍यापारी, उद्योजक, हॉटेल चालक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात आले आहेत. त्‍यांनाही अशा करांच्‍या सवलती मिळायला हव्यात.

पुढे बोलताना ते म्हणाले की महाविकास आघाडीत स्‍वत:ची निर्णयक्षमता दिसून येत नाही. यापूर्वीही सरकारने मंदिरं बंद ठेवून मदिरालयं सुरू ठेवली होती. आताही तशीच परिस्थिती आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्‍याचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, दुसरीकडे परमिट रूम सुरूच आहेत. यावरूनच या सरकारची दिशा कोणती आहे हे समजते. केवळ सामान्‍य माणसाने नियम पाळावे अशी अपेक्षा सरकार करणार असेल तर ते चुकीचे आहे. महाविकास आघाडी सरकार केवळ टास्‍क फोर्स स्‍थापन करून, त्‍यापाठीमागे लपण्‍याचा प्रयत्‍न करीत आहे. सरकारने टास्‍क फोर्सच्या सुचनांचा फेरविचार करावा, अशी मागणी यावेळी विखे पाटील यांनी केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago