Guidelines prepared by the state government for starting a restaurant
काही दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी फोन करुन धमकी देणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसने या आरोपीला कोलकातामधून अटक केली आहे. याच आरोपीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना खासदार संयज राऊत यांनाही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र एटीएस यांना खात्रीलायक बातमी मिळाली होती की कोलकाता येथे राहणारा एक इसम या धमकी प्रकरणाशी संबंधित आहे. त्यानंतर या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचं एक पथक कोलकाताला रवाना झालं. या पथकाने गोपनियरित्या शहानिशा करुन कोलकाता पोलिसांच्या मदतीने या आरोपीला अटक केली आहे.
आरोपीकडून पोलिसांनी दोन मोबाइल फोन, एक भारतीय सिमकार्ड आणि तीन दुबईतील मोबाइल सिमकार्ड्स जप्त केले आहेत. हा आरोपी फोन करुन आपण कुप्रसिद्ध दाऊद टोळीचा सदस्य असल्याचं सांगून जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. या प्रकरणी आरोपी विरुद्ध मुंबई पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या आरोपीची प्राथमिक चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. आरोपी हा विज्ञान शाखेचा पदवीधर असून नोकरीसाठी गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ तो दुबईमध्ये राहत असल्याची माहिती दिली आहे. आरोपीचे दुबई येथील वास्तव्य, गुन्हेगारी हालचाली याबाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…