accident of bjp mla kisan kathore 2 dead in kalyan
कल्याण : भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणीचा मृत्यू झाला आहे. आमदार किसन कथोरे यांच्या मणक्याला दुखापत झाली आहे अशी माहिती मिळत आहे.
भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने कल्याण तालुक्यातील दहागावजवळ एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर असलेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणाचं नाव अमित नंदकुमार सिंग असं आहे. हा तरुण कल्याण ग्रामीणमधील पिसवली परिसरातील रहिवासी होता. त्याच्यासोबत असलेल्या तरुणीचं नाव सिमरन सिंग असं आहे.
आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
या अपघातात आमदार किसन कथोरे थोडक्यात बचावले आहेत. आमदार कथोरे यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर कल्याणमधील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले असून कथोरे यांना डिस्चार्ज मिळाला आहे. अपघात इतका भीषण होता की गाडीची एअर बॅगही फुटली. टिटवाळा पोलीस पुढील तपास करत आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…