महाराष्ट्र

मोठी बातमी! राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी, न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश

मुंबई : सांगलीतील शिराळा येथील न्यायालयाने 6 एप्रिल रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात 2008 च्या आयपीसी 143, 109, 117, 7 मधील फौजदारी दुरुस्ती आणि 135 मधील खटल्याच्या संदर्भात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. एका जुन्या प्रकरणात हे वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती आहे. ६ एप्रिल रोजी हे वॉरंट जारी करूनही अद्याप राज यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही, असा सवालही कोर्टाने पोलिसांना विचारल्याचं सांगितलं जात आहे.

न्यायालयाने मुंबई पोलीस आयुक्तांना अजामीनपात्र वॉरंटमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते, मात्र, मुंबई पोलिसांनी अद्याप या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांच्याविरोधात बीडमधील परळी न्यायालयानेही अटक वॉरंट जारी केले होते. २००८ साली राज ठाकरे यांच्या समर्थनार्थ परळीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक केली होती. याप्रकरणात गुन्हा दाखल होऊन हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यानंतर राज ठाकरे यांना अनेकदा न्यायालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. परंतु, राज ठाकरे एकाही सुनावणीला हजर राहिले नव्हते. जामीन देऊनही सतत तारखेला गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago