काम-धंदा

मोठी बातमी! कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, घर आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य

नवी दिल्ली : रतन टाटा प्रत्येक वेळेस देशासाठी मोलाचे योगदान देतात, त्यांनी तशीच एक मोठी घोषणा करून एक नवीन आदर्श समोर ठेवला आहे. टाटा स्टील कंपनीने कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान बरेच लोक मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना संकटाच्या वेळीही कर्मचारी सातत्याने कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावर असताना अनेक कर्मचार्‍यांचे मृत्यूही झाले. अशा परिस्थितीत कंपनीने म्हटले आहे की कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे सेवा पूर्ण होईपर्यंत कुटुंबास संपूर्ण वेतन दिले जाणार आहे. याबरोबरच निवास आणि वैद्यकीय सुविधादेखील देण्यात येणार आहे. इतकेच नाही तर मुलांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्चही कंपनी उचलणार आहे.

टाटा स्टील व्यवस्थापनाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, कंपनी आपल्या कर्मचार्‍यांच्या सामाजिक सुरक्षेच्या मदतीसाठी सर्वतोपरी पुढाकार घेत आहे, जेणेकरून कंपनीत कार्यरत प्रत्येक कर्मचार्‍यांचे भविष्य उत्तम होईल. कोरोनामुळे एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास टाटा स्टील 60 वर्षे त्यांच्या अवलंबितांना संपूर्ण वेतन देईल. पगाराशिवाय कर्मचार्‍यांच्या कुटुंबांनाही क्वार्टर आणि वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. जर कर्तव्य बजावताना कंपनीत कामगार मृत्युमुखी पडला तर त्यांच्या मुलांच्या पदवीचा संपूर्ण खर्च कंपनी व्यवस्थापन उचलेल.

टाटा स्टील मॅनेजमेंटचे म्हणणे आहे की, कंपनी नेहमीच आपल्या कर्मचार्‍यांच्या आणि भागधारकांच्या फायद्यासाठी विचार करीत असते. कोविडच्या काळातही टाटा स्टील सामाजिक कल्याणासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. यापूर्वी टाटा यांनी कर्मचार्‍यांच्या हितासाठी अनेक पावले उचललीत आणि एक आदर्श मानक स्थापित केला. टाटा स्टील ही देशातील पहिली कंपनी आहे, जी आपल्या कर्मचार्‍यांसाठी 8 तासांच्या कामाच्या शिफ्ट, कंपनीचा नफा-आधारित बोनस, सामाजिक सुरक्षा, प्रसूती रजा, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची प्रभावीपणे अंमलबजावणी करते. टाटा यांच्या पुढाकारानंतरच देशातील इतर कंपन्यांनीही असे निकष अवलंबिले.

TATA मोर्टसचा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नवा उपक्रम

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago