महाराष्ट्र

थरार : डोळ्यात मिरचीपूड फेकून १९ लाख ५० हजार रुपये लुटायला गेले आणि…

अमरावती : डोळ्यात मिरचीपूड फेकून एका व्यक्तीकडील १९ लाख ५० हजार रुपये लुटण्याचा प्रयत्न झाला होता. १९ मे रोजी सकाळी १०.30 च्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणातील गुन्हेगारांना शोधण्यासाठी शहरातील विविध ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनोज चौधरी (वय ३५) हे एका खाजगी कंपनीत मनी ट्रान्सफरचे काम करतात. ते दुचाकीने श्याम चौकातील स्टेट बँकेमध्ये रक्कम भरण्यासाठी निघाले होते. त्यांच्या बॅगमध्ये १९.५० लाख रुपये होते. काही अंतरावरच लुटारूंनी त्यांच्या डोळयात मिरचीपूड फेकून त्यांना लुटण्याचा आणि ही रक्कम लांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चौधरी त्यांच्या या हल्ल्यातून निसटले. त्यांनी या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पोलिसांनी कसून तपास केला आणि लुटारूंच्या शोधात फ्रेजरपुरा, कोतवाली, गाडगेनगर, राजा पेठ आणि बडनेरा या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे ४० ठिकाणांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून पोलिसांनी लुटारूंचा माग काढला. त्या आधारे अनिकेत ज्ञानेश्वर जाधव (२७, रा. अकोली), साहील नरेश मेश्राम (२४, रा. माता फैल बडनेरा) आणि यश सुनील कडू (२४, रा. जेवडनगर) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीस शनिवारी सकाळी साईनगर भागातील एका कुरिअरच्या कार्यालयाजवळ पोहचले. तिथे अनिकेत जाधव काम करत होता. या प्रकरणाचा मास्टर माइंड अनिकेत जाधव असल्याचे समोर आले. कोतवाली पोलिसांनी शनिवारी सकाळी त्याला ताब्यात घेतले. साहील मेश्राम व यश कडू हे पळून जाण्याच्या तयारीत होते, मात्र त्याअगोदरच त्यांना बडनेरा रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. दरम्यान, गुन्हा करतेवेळी यांच्यासोबत आणखी एक जण असल्याचे समोर आले आहे, त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago