NPCIL Recruitment 2022 notification out for 225 executive trainee posts
NPCIL Recruitment 2022 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने विविध श्रेणींमध्ये 225 कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग पार्श्वभूमी असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2022 आहे. अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख देखील 28 एप्रिल आहे.
रिक्त जागा :
मेकॅनिकल -87
केमिकल – 49
इलेक्ट्रिकल-31
इलेक्ट्रॉनिक्स-13
इन्स्ट्रुमेंटेशन – 12
सिव्हिल – 13
शैक्षणिक पात्रता
वरील 6 अभियांत्रिकी शाखेपैकी कोणत्याही एका शाखेत किमान 60% गुणांसह BE/B.Tech/B. Sc (अभियांत्रिकी)/ 5 वर्षांचा इंटिग्रेटेड M.Tech अभ्यासक्रम, जो संस्था AICTE किंवा UGC द्वारे मान्यताप्राप्त असेल आणि GATE 2020, GATE 2021 किंवा GATE 2022 चा वैध स्कोअर.
कमाल वयोमर्यादा – 26 वर्षे. 28 एप्रिल 2022 पासून वयाची गणना केली जाईल. ओबीसींना तीन वर्षांची आणि एससी/एसटीला पाच वर्षांची सूट मिळेल.
निवड
मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. 13 जून ते 25 जून 2022 या कालावधीत मुलाखती होणार आहेत.
पगार
प्रशिक्षणादरम्यान पगार – रु. 55,000 प्रति महिना
प्रशिक्षणानंतर, लेव्हल-10 चा ग्रेड असेल. पे मॅट्रिक्स – रु.56,100 रु.
GATE 2020, GATE 2021 आणि GATE 2022 स्कोअरच्या आधारे उमेदवारांना मुलाखतीसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल. उमेदवारांना 1:12 च्या प्रमाणात बोलावले जाईल.
मुलाखतीतील कामगिरीच्या आधारे अंतिम निवड केली जाईल. अंतिम निवडीमध्ये GATE स्कोअरला कोणतेही महत्त्व दिले जाणार नाही.
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…