काम-धंदा

नोकरीची संधी! ‘या’ IT कंपन्यांमध्ये तीन लाखांहून अधिक जणांसाठी भरतीची घोषणा

IT Companies : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने खासगी क्षेत्रात पुन्हा नोकरीच्या संधी येऊ लागल्या आहेत. डिजिटल क्षेत्रातील आयटी कंपन्या या वर्षीही मोठी भरती करत आहेत. टाटा समूहाची TCS, Infosys, Wipro, HCL, Cognizant आणि Capgemini सारख्या IT कंपन्या मोठ्या प्रमाणात भरती करत आहेत. या IT कंपन्यांनी जास्तीत – जास्त फ्रेशर्ससाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. यासोबतच या कंपन्यांनी आर्थिक वर्षात तीन लाखांहून अधिक नवीन नियुक्त्या करण्याची घोषणा केली आहे.

विप्रो-एचसीएल, TCS मध्ये भरती
विप्रोने चालू आर्थिक वर्षात 30,000 भरतीचे लक्ष्य ठेवले आहे, जे मागील वर्षाच्या म्हणजे 2021 च्या जवळपास दुप्पट आहे. गेल्या आर्थिक वर्षात विप्रोने 17,500 नियुक्त्या केल्या होत्या. HCL ने यावर्षी भरतीचे लक्ष्य 45 हजार केले आहे. टाटा समूहाच्या टीसीएसने लक्ष्यापेक्षा अधिक भरती केली. देशातील सर्वात मोठी IT कंपनी TCS ने चालू आर्थिक वर्षात 40 हजार पदवीधर म्हणजेच फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षीही टीसीएसने सुमारे एवढ्या भरतीचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु कंपनीने त्याच्या तुलनेत एक लाख नवीन नियुक्त्या केल्या.

इन्फोसिसमध्ये 50 हजारांची भरती
देशातील सर्वात मोठ्या IT कंपन्यांपैकी एक असलेली Infosys यावर्षी 50,000 फ्रेशर्सची भरती करणार आहे. 2021 मध्ये, कंपनीने 85,000 नवीन नियुक्त्या केल्या, जे लक्ष्यापेक्षा जवळपास दुप्पट आहे. यंदाही ५० हजारांहून अधिक अपॉइंटमेंट्स होऊ शकतात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago