world no tobacco day over 80 million people died each year worldwide due to tobacco
World no tobacco Day : जगभर तंबाखूचे सेवन ही एक मोठी समस्या आहे. दरवर्षी, जगभरातील 80 लाखाहूनही अधिक लोक तंबाखूच्या सेवनामुळे मृत्यूमुखी पडतात. तंबाखूचे सेवन किंवा धूम्रपान हे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचे मुख्य कारण आहे. केवळ भारतातच तंबाखूमुळे दरवर्षी १३ लाखाहून अधिक लोक मरत आहेत.
जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या दिवशी, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) तंबाखूचे सेवन सोडविण्यासाठी व त्यावर मात करण्यासाठी एक टूलकिट जाहीर केली आहे. तसेच, जागतिक आरोग्य संघटनेने 27 मे रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालात सांगितले आहे की लोक आजारी पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखूचा वापर किंवा धूम्रपान आहे.
सिगारेटमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम, नवीन अभ्यासात समोर आले धक्कादायक निष्कर्ष
WHO च्या आकडेवारीनुसार, जगभरात 130 कोटी लोक तंबाखूचे सेवन करतात. यापैकी ८०% तंबाखू सेवन करणारे लोक मध्यम उत्पन्न असणार्या देशांमध्ये राहतात. अहवालानुसार, तंबाखू दरवर्षी जगभरात 80 लाखाहून अधिक लोकांच्या मृत्यूचे कारण बनत आहे. तर, अशी तब्बल १२ लाख माणसे आहेत जे तंबाखूच्या धुराच्या संपर्कात असतात किंवा कधीकधी जे मित्रांबरोबर किंवा इतरांबरोबर सामायिक करुन त्याचे सेवन करतात.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, दरवर्षी तंबाखू आणि धूम्रपान केल्यामुळे भारतात सुमारे १३,००,000 मृत्यू होतात. ते म्हणाले की, मागील वर्षांच्या भारतातील अभ्यासातून असे दिसून आले आहे की तंबाखू सेवन करणार्यांच्या संख्येत 6% घट झाली आहे. ती संख्या 34.6% वरून 28.6% वर आली आहे.
डॉ. हर्षवर्धन म्हणाले की तंबाखू आणि विशेषत: धूम्रपान करणार्यांना कोरोनाचा धोका 40 ते 50% पर्यंत अधिक जीवघेणा ठरतो. यामुळे केवळ फुफ्फुस, हृदय आणि कर्करोग यासारखेच आजार उद्भवत नाहीत, तर शरीराच्या प्रत्येक भागावर दुष्परिणाम देखील होतात. ते म्हणाले की चांगल्या आरोग्यासाठी तंबाखू आणि धूम्रपान टाळणे फार महत्वाचे आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…