Restrictions on foreign journalists
ऑस्ट्रेलियाचे गृह कामकाज मंत्री पीटर डय़ुटन यांनी सांगितले, की ऑस्ट्रेलियातील संघराज्य पोलिस विभाग व परराष्ट्र विभाग हे आता सरकारच्या इतर विभागांशी सहकार्य करतील. ऑस्ट्रेलियातील परदेशी हस्तक्षेपावर लक्ष ठेवण्याचे काम आता गांभीर्याने केले जाणार आहे. जर येथे काही परदेशी पत्रकार चुकीच्या पक्षपाती बातम्या देत असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. ऑस्ट्रेलियन कायद्याच्या हिताविरोधात काम करणारे परदेशी पत्रकार व उद्योगपती यांच्यावर कारवाई केली जाईल. हेरगिरीच्या कारवाया कुणी केल्या तर तो एक मोठा प्रश्न आहे. ऑस्ट्रेलियात येणाऱ्या परदेशी पत्रकारांची छाननी केली जाईल.
ऑस्ट्रेलियाच्या दोन पत्रकारांवर चीनने कारवाई करून त्यांना मायदेशी हाकलून दिले होते. या पत्रकारांचे चीनने जाबजबाब घेतले होते. बिल बिर्टल्स व माइक स्मिथ अशी त्यांची नावे असून त्यांनी चीनमधील कायदेशीर कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला होता.
चीनच्या या कृतीला प्रतिसाद म्हणून ऑस्ट्रेलियानेही परदेशी पत्रकारांवर देखरेखीचा बडगा उगारला आहे. लेई नावाच्या ऑस्ट्रेलियाच्या एका पत्रकारास चीनने ताब्यात घेतले आहे, त्याचे काय झाले हे पुढे काहीच समजलेले नाही.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…