ग्लोबल

ओमिक्रॉनचे एक असामान्य लक्षण आले समोर, जाणवल्यास घ्या तज्ज्ञांचा सल्ला

जगभरातील शास्त्रज्ञ ओमिक्रॉनबद्दल नवनवीन माहिती गोळा करत आहेत. डब्ल्यूएचओने चेतावणी देखील जारी केली आहे की ओमिक्रॉन कोरोनाव्हायरसच्या इतर कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरतो. अशा परिस्थितीत लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळेच आरोग्य तज्ञ लोकांना कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देत आहेत.

डॉक्टरांनी ओमिक्रॉनचे एक असामान्य लक्षण नोंदवले आहे जे सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. ओमिक्रॉनच्या बहुतेक रुग्णांमध्ये, एक विशिष्ट लक्षण निश्चितपणे आढळून येते आणि ते म्हणजे भूक न लागणे. जर तुम्हाला इतर काही लक्षणांसह भूक लागत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानंतर कोविड चाचणी करून घ्यावी. चव आणि वास कमी होणे, ताप, घसा खवखवणे आणि अंगदुखी ही कोरोनाची सर्वात सामान्य लक्षणे आहेत. तथापि, ओमिक्रॉनच्या प्रत्येक रुग्णामध्ये ही लक्षणे आढळत नाहीत. आत्तापर्यंतच्या आकडेवारीच्या आधारे, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की केवळ 50% कोरोना रुग्णांना ताप, कफ आणि चव आणि वास कमी झाल्यासारखे वाटत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago