ठाणे

दुःखद! खेळताना पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून १ वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात अतिशय दुःखद घटना घडली आहे. बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. शहरातील देवनगर भागात ही दुर्दैवी घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील देवनगर भागात एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. बाथरूममध्ये पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून त्याचा मृत्यू झाला. घटना घडली त्यावेळी त्याची आई किचनमध्ये स्वयंपाक करत होती. तर या बाळाची इतर भावंडे टीव्ही बघत बसली होती. हा चिमुकला खेळता खेळता बाथरूममध्ये गेला. तिथे पाणी खेळत असताना बादलीत पडून त्याचा मृत्यू झाला.

दिलकैश अन्सारी असे या चिमुकल्याचे नाव आहे. दिलकैश हा सहा भावंडांमध्ये सर्वात लहान होता. तो आपल्या भावंडांसोबत हॉलमध्ये खेळत होता. त्याची आई शबाना अन्सारी ही स्वयंपाकघरात होती. स्वयंपाक केल्यानंतर ती स्वंयपाकघरातून बाहेर आली, त्यावेळी दिलकैश कुठेही दिसत नव्हता. त्यामुळे शबानाने शोधाशोध सुरू केली. शबाना बाथरूममध्ये गेली तेव्हा तिला दिलकैशचा मृतदेह बादलीत आढळला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शबाना हिच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात दिलकैशच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

7 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

7 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

7 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago