chef died after fall in chicken soup during making food
बगदाद : एका लग्नसमारंभात जेवण बनवताना एक दुर्दैवी घटना घडली आहे. जेवण बनवत असताना एक 25 वर्षीय शेफ पाय घसरून गरम चिकन सूपच्या भांड्यात पडला. यात तो 70 टक्के भाजला गेला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रयत्नांची पराकाष्टा करूनही डॉक्टर या व्यक्तीला वाचवू शकले नाहीत. या दुर्दैवी घटनेने अनेकांना धक्का बसला असून रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या किचनमधील सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना इराकच्या जाखो जिल्ह्यातील हेजल हॉलमध्ये घडली. याठिकाणी शेफ इस्सा इस्माइल वेडिंग पार्टीसाठी चिकन सूप तयार करत होते. दरम्यान, त्यांचा पाय घसरला आणि ते उकळत्या सूपच्या भांड्यात पडले. यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते, परंतु, अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि त्यांचा मृत्यू झाला.
इस्सा इस्माइल यांच्या एका नातेवाईकाने सांगितले की इस्माइल अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी जेवण बनवण्याचे काम करत होते. सध्या ते दोन पार्टी हॉलसाठी काम करायचे. इस्माइल यांना तीन मुलं आहेत.
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या, खिडकी फोडून घरात घुसले आरोपी…
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला 30 किलो वजनाच्या साखळ्यांनी बांधले, आणि…
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…