मनोरंजन

मंदिरा बेदीचे पती राज यांना 29 जूनच्या संध्याकाळीच अस्वस्थ वाटत होतं, पण…, सुलेमान मर्चेंट यांनी केला खुलासा

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे ३० जूनला पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे मंदिरी बेदी आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक राज कौशल यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूड इंडस्ट्रीला देखील मोठा धक्का बसला.

राज कौशल यांच्या निधनानंतर राज आणि मंदिराचे जवळचे मित्र असलेल्या सुलेमान मर्चेंट यांनी एक खुलासा केला आहे. राज कौशल यांना हार्ट अटॅक येणार याची आधीच कल्पना आली होती आणि त्यांनी याबद्दल मंदिराला सांगितले होते. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्युझिक डायरेक्टर सुलेमान यांनी याबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले कि, “29 जूनच्या संध्याकाळीच राज यांना अस्वस्थ वाटत होतं. त्यामुळे त्यांनी पित्ताची काही औषधं घेतली आणि ते झोपले. त्यानंतर पुन्हा मध्यरात्री त्यांना अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्यांनी मंदिराला त्यांना हृदयविकाराचा झटका येत असल्याचं सांगितलं. राजने मंदिराला हार्ट अटॅक येत असल्याचं सांगताच तिने त्यांचा मित्र आशिष चौधरीला लगेचच फोन केला.”

पुढे ते म्हणाले, “आशिष तात्काळ मंदिराच्या घरी पोहचला. मंदिरा आणि आशिष तातडीने राजला घेऊन रुग्णालयात निघाले. मात्र रुग्णालयात जाताना गाडीतच राजची प्रकृती अधिक खालावली. पुढच्या ५-१० मिनिटांत राजच्या हृदयाचे ठोके थांबल्याचं मंदिराच्या लक्षात आलं. ते रुग्णालयात पोहचले तेव्हा डॉक्टरांनी राज यांना मृत घोषित केलं.”

दुःखद! अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे निधन

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago