देश

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला 30 किलो वजनाच्या साखळ्यांनी बांधले, आणि…

राजस्थान : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मागील 3 महिन्यांपासून 30 किलो वजनाच्या साखळीने बांधून ठेवले होते. याबद्दल माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना लोखंडी साखळ्यांनी बांधलेली ही महिला आढळली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी या महिलेला लोखंडी साखळीतून मुक्त केले.

पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरूलाल याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्याने जवळपास तीन महिन्यांपासून आपल्या पत्नीला 30 किलो वजनाच्या लोखंडी साखळीने बांधले होते. भैरूलाल तिला मानसिक त्रास देत होता. जेव्हा पोलिसांना याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा ते पोलीस दलासह भैरूलालच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना ही महिला दिसली, तिला लोखंडी साखळीने बांधून ठेवले होते. पोलिसांनी महिलेला नाव विचारले असता तिने तिचे नाव जीवाबाई असल्याचे सांगितले.

पोलिसांनी महिलेला विचारले की तिला अशा प्रकारे बांधून का ठेवले आहे? तेव्हा तिने सांगितले कि, “माझे माहेर हिंगलाटमध्ये आहे. तिथे माझी आई सीताबाई राहते. माझं लग्न भैरूलाल मीणाबरोबर झालं. मी माझ्या आईची सेवा करण्यासाठी आणि शेतीचे काम करण्यासाठी मधून-मधून हिंगलाटमध्ये जायचे. मात्र, माझा नवरा मला तिथे येऊन मारहाण करायचा.

पीडित महिलेने पुढे सांगितले की माझा नवरा दारू पिऊन यायचा आणि माझ्यावर संशय घ्यायचा. त्याला वाटायचे की माझे कोणाशी तरी अवैध संबंध आहेत, त्यामुळे तो माझ्यावर अत्याचार करायचा. पण, होळीनंतर दोन-तीन दिवसांनी पती भैरुलाल, या महिलेचा मुलगा राजू आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला लोखंडी साखळीने बांधून ठेवले. तेव्हापासून ती याच अवस्थेत राहत होती.

सुमारे तीन महिन्यांपासून लोखंडी साखळीने बांधून ठेवल्यामुळे या महिलेला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास झाला आहे. या महिलेचा नवरा दररोज तिला मारहाण करायचा. तो लोखंडी साखळीला कुलूप लावून चावी आपल्याबरोबर घेऊन जायचा. लोखंडी साखळीने बांधल्यामुळे महिलेच्या डाव्या पायाला सूज आली आहे. पीडित महिलेने तिला त्रास देणाऱ्या कुटुंबातील सदस्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago