A father raped his 10-month-old daughter
अमेरिकेतील पेनसिल्व्हेनियामध्ये एका पित्यानेच आपल्या १० महिन्याच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुलीवर बलात्कार केल्यानंतर ती कोणतीच हालचाल करत नसल्याचे पाहून या आरोपीने गुगलवर मुलगी मेलीय की जिंवत आहे हे कसं कळेल यासंदर्भात सर्च केलं. या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार या प्रकरणामध्ये २९ वर्षीय स्टीवन ऑस्टिन याला अटक करण्यात आली आहे. ऑस्टिन एक फुटबॉल प्रशिक्षक आहे. जारा स्क्राग या आपल्या १० महिन्याच्या मुलीवर ऑस्टिनने बलात्कार केला. शनिवारी सकाळी ऑस्टिनने पोलिसांना ९११ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करुन आपल्या मुलीचा श्वास बंद पडला आहे अशी माहिती दिली. ऑस्टिन मुलीला रुग्णालयात घेऊन गेला मात्र डॉक्टरांना तिचे प्राण वाचवता आले नाही. रुग्णालयाने यासंदर्भातील माहिती पोलिसांना कळवली.
या लहान मुलीच्या डायरपरवर रक्ताचे डाग सापडल्याने पोलिसांना शंका आली. त्यांनी या डायपरच्या चाचण्या केल्या असता त्यांना त्यावर ऑस्टिनच्या विर्याचे अंशही सापडले. मुलीच्या शवविच्छेदन आणि ऑटोप्सी चाचण्यांमध्ये तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले. या प्रकरणामुळे या मुलीची आई काही बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑस्टिनच्या ब्राउजर सर्च हिस्ट्रीमुळे हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ऑस्टिनने पोलिसांना फोन करण्याच्या एक तास आधी गुगलवर मुलगी जिवंत आहे की मेलीय हे कसं कळेल यासंदर्भात सर्च केलं होतं. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. ऑस्टिनविरोधात लैंगिक अत्याचार, मुलीवर बलात्कार करणे आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…