क्रीडा

IPL २०२० SRH vs KXIP: हैदराबादने पंजाबचा 69 रन्सने केला पराभव

IPL २०२० :  सनरायजर्स हैदराबाद  आणि किंग्स इलेव्हन पंजाब  या मॅचमध्ये हैदराबादने पंबाजचा ६९ रन्सने पराभव केला आहे. सनरायजर्स हैदराबादने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेली किंग्स इलेव्हन पंजाबची टीम 16.5 ओव्हर्समध्ये 132 रन्स करुन ऑल आऊट झाली.

मयांक अग्रवाल हा केवळ 9 रन्स करुन रन आऊट झाला. त्यानंतर केएल राहुल हा 11 रन्स करुन आणि सिमरन सिंग 11 रन्स करुन माघारी परतले. निकोलस पूरन याने टीमला सावरण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला इतर बॅट्समनची साथ मिळाली नाही. निकोलस पूरन याने 37 बॉल्समध्ये 77 रन्सची इनिंग खेळली. सनरायजर्स हैदराबादकडून राशिद खान याने सर्वाधिक म्हणजेच तीन विकेट्स घेतल्या. राशिद खान याने चार ओव्हर्समध्ये तीन विकेट्स घेतल्या. खलील अहमद आणि टी नटराजन या दोघांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर अभिषेक शर्मा याने एक विकेट घेतली.

या विजयामुळे सनरायजर्स हैदराबादची टीम आयपीएल 2020च्या पॉईंट्स टेबलमध्ये सहाव्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या क्रमांकावर दाखल झाली आहे. सनरायजर्स हैदराबादने आतापर्यंत सहा मॅचेस खेळल्या असून त्यापैकी तीन मॅचेसमध्ये विजय मिळवत आपल्या खात्यात सहा पॉईंट्स जमा केले आहेत. आता सहा पॉईंट्ससह सनरायजर्स हैदराबाद पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे तर किंग्स इलेव्हन पंजाब शेवटच्या म्हणजेच आठव्या क्रमांकावर आहे.

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या मॅचच्या सुरुवातीला सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकत प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादच्या टीमने प्रथम बॅटिंग करत 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स गमावत 201 रन्स केल्या आणि किंग्स इलेव्हन पंजाबसमोर विजयासाठी 202 रन्सचं आव्हान उभं केलं. सनरायजर्स हैदराबादच्या टीमकडून जॉनी बेयरस्टो याने दबरदस्त इनिंग खेळली. बेयरस्टो याने 55 बॉल्समध्ये 97 रन्स केल्या. यामध्ये सात फोर आणि सहा सिक्सचा समावेश आहे. तर डेविड वॉर्नर याने 40 बॉल्समध्ये 52 रन्स केल्या.

केन विलियमसन याने 10 बॉल्समध्ये 20 रन्स केल्या. अभिषेक शर्मा याने 6 बॉल्समध्ये 12 रन्स केल्या. तर किंग्स इलेव्हन पंजाबकडून रवी बिश्नोई याने तीन विकेट्स घेतल्या. रवी बिश्नोई याने तीन ओव्हर्समध्ये 29 रन्स देत तीन विकेट्स घेतल्या. अर्षदीप सिंग याने दोन तर मोहम्मद शमी याने एक विकेट घेतली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

4 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago