veteran kannada actor kalatapasvi rajesh passes away at 89 in bengaluru
बेंगळुरू : ज्येष्ठ कन्नड अभिनेते ‘कलातपस्वी’ राजेश यांचे आज बेंगळुरू येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 9 फेब्रुवारीला श्वसनाचा त्रास आणि वयोमानाशी संबंधित आजारांमुळे बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या राजेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज (19 फेब्रुवारी) सकाळी त्यांची प्रकृती खालावली. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनाने त्यांचे चाहते हळहळले.
15 एप्रिल 1932 रोजी बेंगळुरू येथे मुनी चौडप्पा म्हणून जन्मलेल्या राजेश यांनी शालेय आणि महाविद्यालयीन दिवसांपासून नाटकांमध्ये काम केले आहे. नंतर त्यांची ओळख विद्यासागर अशी झाली. चित्रपटसृष्टीत ते ‘कलातपस्वी’ राजेश म्हणून लोकप्रिय झाले. 60 च्या दशकात त्यांनी कन्नड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी शेकडो चित्रपट पुरस्कार जिंकले आहेत.
राजेश यांची मुलगी आशा राणी देखील एक फिल्ममेकर आहे. अभिनेता अर्जुन सरजाने 1988 मध्ये आशा राणीसोबत लग्न केले होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…