मनोरंजन

सोहेल खान आणि सीमा खान यांचा विभक्त होण्याचा निर्णय, घटस्फोटासाठी केला अर्ज दाखल

मुंबई : 24 वर्ष एकत्र राहिल्यानंतर सोहेल खान आणि सीमा सचदेव-खान यांनी शुक्रवारी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. विभक्त जोडपे आज मुंबईतील कौटुंबिक न्यायालयातून बाहेर पडताना दिसले. सीमा आणि सोहेलने अद्याप त्यांच्या घटस्फोटाबाबत अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. मात्र, ते काही काळापासून वेगळे झाले आहेत.

1998 मध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर, सोहेल आणि सीमा यांनी 2000 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलाचे, मुलगा निर्वान खानचे स्वागत केले. त्यानंतर जून 2011 मध्ये सरोगसीद्वारे या जोडप्याचा दुसरा मुलगा योहानचा जन्म झाला. गेल्या वर्षी, त्यांच्या कुटुंबाने योहानचा 10 वा वाढदिवस साजरा केला. शुक्रवारी कौटुंबिक न्यायालयातून सोहेल आणि सीमा स्वतंत्रपणे बाहेर पडताना दिसले. न्यायालयीन सूत्राने ETimes ला खुलासा केला कि, “सोहेल खान आणि सीमा सचदेव आज न्यायालयात हजर होते. त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. दोघेही एकमेकांबरोबर सामान्य आणि मैत्रीपूर्ण वागत होते.”

प्यार किया तो डरना क्या या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता-निर्माता सोहेल खान याची पहिली भेट दिल्लीत राहणाऱ्या सीमा यांच्याशी झाली होती. त्यावेळी सीमा मुंबईत राहात होती आणि फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करत होती. सोहेल आणि सीमाने डेट करण्यास सुरुवात केली आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सीमाच्या कुटुंबीयांनी लग्नाला मान्यता दिली नाही. त्यानंतर सोहेल आणि सीमा यांनी घरातून पळ काढला आणि जवळच्या मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत आपापल्या धर्माचे पालन करून गुपचूप लग्न केले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

6 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

6 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

6 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago