Koli Bandhav and Warakari on Krishnakunj to present their problems
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. भोंगेविरोधी आंदोलनच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी जीवे मारण्याच्या धमकीचे पत्र आले होते.
यासंबंधी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल संध्याकाळी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर आज अखेर राज्य सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा दर्जा पूर्वीचाच Y+ असणार आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेतील ताफ्यात पोलिसांची वाढ करण्यात आली आहे. सुरक्षा ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…