मनोरंजन

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले रुग्णालयात दाखल, अचानक बिघडली प्रकृती

सिनेसृष्टीतील ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांच्याविषयी मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंद भोसले यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना दुबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, गायिका आशा भोसले आपल्या मुलासोबत दुबईत आहेत, आनंद पूर्णपणे बरा होईपर्यंत त्या तिथेच राहणार आहेत. आनंद यांना गेल्या काही दिवसांपासून आरोग्याच्या समस्या भेडसावत होत्या, चक्कर आल्याने ते जमिनीवर पडले, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

चक्कर येऊन जमिनीवर पडल्याने आनंद यांना किरकोळ दुखापत झाली होती, मात्र यामुळे मंगेशकर आणि भोसले कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, आनंद भोसले यांच्या प्रकृतीबाबत बॉलिवूडमधून चिंता व्यक्त केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिलासा देणारी बातमी म्हणजे आता आनंद यांना आयसीयू वॉर्डमधून जनरल वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे. आशा भोसले यांचा दुसरा मुलगा आनंद याने चित्रपट दिग्दर्शन आणि व्यवसायाचे शिक्षण घेतले आहे.

आशा भोसले यांचा मोठा मुलगा हेमंत याचे २०१५ मध्ये कर्करोगाने निधन झाले होते. आशा भोसले यांची मुलगी वर्षा भोसले यांनी २०१२ मध्ये आत्महत्या केली होती. आशा यांची सर्व मुले त्यांचे पहिले पती गणपतराव भोसले यांची होती, त्यांचे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या 11 वर्षानंतर आशा आणि गणपतराव यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. नंतर आशा भोसले यांनी आरडी बर्मन यांच्याशी विवाह केला.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 दिवस ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

7 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 आठवडा ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago