मनोरंजन

शाहिद कपूर आणि करीना कपूर तब्बल १८ वर्षांनी भेटले, एकमेकांना मिठी मारली आणि…

मुंबई : आयफा अवॉर्ड्स २०२५ सोहळा राजस्थानमध्ये आयोजित करण्यात आला आहे. बॉलीवूडच्या विविध नामांकित सेलिब्रिटी राजस्थानला पोहोचत असून तेथील काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात एक व्हिडीओ सर्वाधिक चर्चेत आहे, ज्यामध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री करीना कपूर यांची भेट होताना दिसत आहे.

शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचं ब्रेकअप १८ वर्षांपूर्वी झालं होतं. ब्रेकअपनंतर या दोघांनी एकमेकांबरोबर काम करणं तर दूरच, एकमेकांना सामोरे जाणे देखील टाळले होते. मात्र, आयफा अवॉर्ड्सच्या मंचावर या दोघांची भेट घडली आणि त्यानंतर एक अप्रत्याशित दृश्य दिसले. व्हिडीओत शाहिद आणि करीना एकमेकांची गळाभेट घेताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून ‘जब वी मेट’ या चित्रपटाच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ
आयफा अवॉर्ड्समध्ये शाहिद आणि करीना यांची अचानक भेट झाल्याने सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. शाहिद आणि करीना एकमेकांसमोर आले, त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि नंतर बराच वेळ गप्पा देखील मारल्या. चाहत्यांनी या व्हिडीओवर अनेक दिलखुलास कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओमुळे ‘जब वी मेट’ या लोकप्रिय चित्रपटाच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट आहे. या चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती, आणि त्यातील त्यांची रोमँटिक केमिस्ट्री आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहे. या व्हिडीओमुळे त्यांच्या किमान ‘फ्रेंडली’ नात्याचे संकेत मिळाले आहेत, ज्यामुळे अनेक चाहते खुश झाले आहेत.

“गीत आणि आदित्यचं अखेर रियुनियन झालं!”
“या दोघांना एकत्र पाहून खूप बरं वाटतंय!”
“या दोघांना पाहून माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू आले.”
“ते दोघे बोलतायत आणि मला आनंद होतोय.” अशा अनेक कमेंट चाहत्यांनी केल्या आहेत.

या व्हिडीओमुळे त्यांच्या चाहत्यांना आशा आहे की कदाचित त्यांना भविष्यात एकत्र काम करताना पाहता येईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago