पुणे

नशा उतरली! पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाची जाहीर माफी

पुणे : पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणारा गौरव अहुजा अखेर पोलीसांच्या ताब्यात आला आहे. गौरव अहुजा याने पुण्यात सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केले होते, त्यानंतर पुणे आणि राज्यभर संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केल्यानंतर तो पुण्यातून बाहेर फरार झाला होता, पण आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला लवकर जवळच्या पोलीस ठाण्यात हजर केलं जाईल. त्यानंतर त्याला पुण्याला नेण्यात येईल. त्यानंतर त्याला उद्या कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, गौरव अहुजा याचा माफी मागतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

व्हिडीओत गौरव अहुजा म्हणाला, “मी गौरव अहुजा, पुण्यातील रहिवासी. काल पब्लिकमध्ये जे कृत्य झालं ते खूप चुकीचं होतं. मी दिलगीर आहे आणि संपूर्ण जनता, पोलीस आणि शिंदे साहेबांची माफी मागतो. मला माफ करा आणि एक संधी द्या. सॉरी.”

गौरव अहुजा याच्या या कृत्यामुळे समाजात नाराजी निर्माण झाली असून, तो एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे. त्याच्या पूर्वीच्या कृत्यांमध्ये जुगार आणि खंडणीचे गुन्हे समाविष्ट आहेत. 2021 मध्ये त्याला पुण्यातील नावाजलेल्या गुंड सचिन पोटे, सुनील मखेजा आणि अजय शिंदे यांच्यासोबत अटक करण्यात आली होती. हे चौघे एक रॅकेट चालवत होते, ज्यामध्ये क्रिकेट सामन्यांचे बेटिंग आणि त्याद्वारे तरुणांना अडकवून कर्जबाजारी करणे, त्यांना घरातच चोरी करायला भाग पाडणे यांचा समावेश होता. या प्रकरणात कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली होती आणि त्यामुळे पोलिसांनी चौघांना अटक केली होती.

सध्या, गौरव अहुजा पोलिसांच्या ताब्यात असून, त्याला लवकरच पुण्यातील कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांनी गौरवचा मित्र भाग्येशला देखील ताब्यात घेतले आहे, तो BMW कारमध्ये दारूची बाटली घेऊन बसलेला होता.

दरम्यान, गौरव आहुजाच्या गैरवर्तनाच्या घटनेनंतर, त्याचे वडील मनोज आहुजा यांनी तीव्र निराशा व्यक्त केली होती. ते म्हटले की, “मला लाज वाटते की गौरव माझा मुलगा आहे. त्याने सिग्नलवर नाही तर माझ्या तोंडावर लघुशंका केली.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

4 दिवस ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

4 दिवस ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

4 दिवस ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

5 दिवस ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

1 आठवडा ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago