मनोरंजन

‘मिर्झापूर’मधील अभिनेत्याचा मृतदेह राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला, चाहत्यांना मोठा धक्का

मुंबई : ‘मिर्झापूर-2’ वेबसिरीजमध्ये ललितची भूमिका साकारणारा ब्रह्म मिश्रा याचे त्याच्या अंधेरीतील राहत्या घरात निधन झाले आहे. गेल्या चार वर्षापासून तो मुंबईतील अंधेरी येथे भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबरला त्याच्या छातीत दुखत होतं, त्यामुळे तो डॉक्टरांकडेही गेला होता. डॉक्टरांनी त्याला गॅसेसची औषध देऊन घरी जाण्यास सांगितले होते. आज अभिनेत्याच्या शेजारच्यांनी दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना याबाबत सूचना दिली. ब्रम्ह मिश्रा घराचं दार उघडत नव्हता. त्यामुळे चावीवाल्याला बोलावून दार उघडण्यात आलं. दरम्यान पोलिसांना बाथरूममध्ये मिश्रा पालथा पडलेला आढळला. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यानंतर त्याचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर इस्पितळात पाठवण्यात आला.

मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये ललितची भूमिका साकारणाऱ्या ब्रह्म मिश्रा यांचा सहकारी कलाकार दिव्येंदू शर्माने इंस्टाग्रामवर ललितचा फोटो शेअर करत दु:खद बातमी शेअर केली. ही बातमी समजल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला आहे. दिव्येंदूने ब्रम्ह मिश्राचा स्वतःसोबतचा एक फोटो शेअर करत आमचा ललित आता या जगात नाही अशी पोस्ट लिहिली आहे.

मूळचा भोपाळचा असलेला ब्रह्म मिश्राचे लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न होते. 2013 मध्ये ‘चोर चोर सुपर चोर’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातही ‘खुदाद खान’ची भूमिका साकारली होती.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

3 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago