नागपूर

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तत्काळ सुरु करा, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचे आदेश

नागपूर : कोविडच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे ऑक्सिजन निर्मितीसाठी बसविण्यात आलेले प्रकल्प तत्काळ सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले.

कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधांसोबतच ऑक्सिजनच्या उपलब्धतेसंदर्भात मेयो, मेडिकल येथे प्रत्येकी दोन तर ‘एम्स’मध्ये चार पीएसए प्लांट सुरु करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना तसेच इतर योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ऑक्सिजन प्लांट सुरु करण्यासाठी येणाऱ्या अडचणी संदर्भात विभागीय आयुक्त श्रीमती लवंगारे-वर्मा व जिल्हाधिकारी आर. विमला यांनी प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. तसेच अपूर्ण कामे येत्या दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी दिले.

‘मेयो’मध्ये ऑक्सिजनचे दोन पीएसए प्लांट बसविण्यात येत आहेत. यासाठी आवश्यक असलेले विद्युत रोहित्र व शेड बसविण्याचे काम सुरु आहे. ही कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिल्या. ऑक्सिजन निर्मिती संदर्भात वैद्यकीय विभागातर्फे निश्चित कार्यपद्धती ठरवून देण्यात आली आहे. त्यानुसार दर आठवड्याला ऑक्सिजन ऑडीट करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मेयो हॉस्पिटलला आवश्यक असलेले अल्ट्रा सॉनिक कॅमेरा खरेदीचा प्रस्ताव सादर करण्याबाबतही यावेळी सूचना दिल्या. ‘मेडिकल’मध्ये दोन ऑक्सिजन निर्मिती प्लांट बसविण्यात आले असून यासाठी आवश्यक असलेला विद्युत पुरवठा दहा डिसेंबरपूर्वी करावा. ऑक्सिजन निर्मिती प्लांट पूर्ण क्षमतेने सुरु करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराला दिनांक 16 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्याआधी सार्वजनिक बांधकाम विभाग व विद्युत विभागाने आवश्यक बांधकाम व विद्युत जोडणी पूर्ण करावी. ऑक्सिजन प्लांटच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे कार्यवाही करावी. तसेच यासाठी आवश्यक असलेल्या बायोमेडिकल अभियंत्याच्या सेवा घेण्याबाबतही प्रस्ताव तयार करावा, असेही विभागीय आयुक्तांनी यावेळी सांगितले.

‘मेयो’च्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवणे, डॉ. वैशाली शेलगावकर, ‘मेडिकल’चे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, ‘एम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विद्याधर सरदेशमुख, विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता हेमंत पाटील, राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे अतिरिक्त संचालक डॉ. कृष्णा तिरमनकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर आदी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते.

‘एम्स’मध्ये बसविण्यात आलेल्या चार ऑक्सिजन निर्मिती प्लांटची पाहणी विभागीय आयुक्तांनी केली. ऑक्सिजन निर्मितीसाठी येणाऱ्या अडचणी सोडविण्यासंदर्भात ‘एम्स’च्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांच्यासोबत चर्चा केली. मेयो, मेडिकल तसेच एम्समध्ये ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. निर्धारित कालमर्यादेत सर्व ऑक्सिजन निर्मिती होईल, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी केल्या.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

2 आठवडे ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

3 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

3 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

4 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago