मनोरंजन

दुःखद! ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

मुंबई , ०१-मे-२०२२ : ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्या 61 वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, अर्धांगी, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर, अर्जुन देवा, उतावळा नवरा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम करत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. तसेच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे.

1985 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धूमधडाका’ या चित्रपटात त्यांनी अंबाक्काची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीसोबतच त्या निर्मितीसुद्धा होत्या. 1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. 2004 मध्ये त्या ‘गाव थोर पुढारी चोर’ या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटात त्यांच्यासोबत दिगंबर नाईक आणि किशोर नांदलस्कर मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ‘फ्रेंडशिप बँड’ आणि ‘एए बीबी केके’ या चित्रपटातदेखील त्यांनी भूमिका साकारली होती.

प्रेमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. नव्या कलाकारांना मालिकांचे पैसे तीन महिन्यांपर्यंत मिळत नाहीत. तसंच पडद्यामागील कलाकारांनाही कोणी वाली नाही. त्यांच्यासाठी राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम करण्याचं ठरविल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं सांगितलं होतं.

झी मराठी वाहिनीवरील ‘हे तर काहीच नाही’ या कार्यक्रमात अभिनेत्री प्रेमा किरण यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी ‘दे दणादण’ या चित्रपटातील शूटिंगदरम्यानचा एक किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या, ‘पोलीस वाल्या सायकल वाल्या’ या गाण्याच्या शूटिंगवेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत हे गाणं संपवायचं, अशी ताकीद दिली होती. त्यानंतर या गाण्याचं शूटिंग देखील सुरु झालं. मात्र, शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. अवघी दोन दोन पावलं पुढे जाऊन लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेमा यांना खाली पाडलं. या सीनमध्ये प्रेमा किरण या सायकलीवरून चक्क तीन वेळा पडल्या होत्या. चित्रपटाचा हा किस्सा सांगताना त्या गमतीने म्हणाल्या, ‘मी तीनवेळा पडले म्हणून सिनेमा हिट झाला’, हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला होता. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago