Royal Challengers Bangalore set a target of 171 for the Gujarat Titans
IPL 2022 : आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सला १७१ धावांचे लक्ष्य दिले आहे. बंगळुरूसाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या बॅटमधून आल्या. त्याने 53 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली.
त्याचवेळी रजत पाटीदारने 52 धावा केल्या. 32 चेंडूत 52 धावा करून तो बाद झाला. त्याने 5 चौकार आणि 2 षटकार मारले. मॅक्सवेलनेही या सामन्यात शानदार खेळी खेळली आणि अवघ्या 18 चेंडूत 33 धावा केल्या. आजच्या सामन्यात कार्तिक केवळ 2 धावा करून बाद झाला. तर आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस या सामन्यात आपले खातेही उघडू शकला नाही.
गुजरातविरुद्ध विराट कोहली फॉर्ममध्ये परतला आहे. त्याने 53 चेंडूत 58 धावांची खेळी खेळली. त्याने 6 चौकार आणि 1 षटकार मारला. आयपीएल 2022 मधील विराटचे हे पहिलेच अर्धशतक आहे. मात्र, त्याचा डाव थोडा संथ होता आणि त्याचा स्ट्राईक रेट फक्त 109 होता.
गुजरातकडून प्रदीप सांगवानने सर्वाधिक विकेट घेतल्या. IPL 2022 मध्ये पहिला सामना खेळताना या खेळाडूने 4 षटकात 19 धावा देऊन दोन विकेट घेतल्या. गुजरात संघाने सामन्यात दोन बदल केले आहेत. यश दयाल आणि अभिनव मनोहर यांच्या जागी प्रदीप सांगवान आणि साई सुदर्शन यांची निवड करण्यात आली आहे. त्याचवेळी आरसीबीमध्ये सुयश प्रभुदेसाईच्या जागी महिपाल लोमरोरला संधी मिळाली आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…