Nanded! Two youths brutally murdered in 24 hours
नांदेड, 01 मे : नांदेड शहरात गेल्या दोन दिवसात दोन जणांचा खून झाला आहे. दोन दिवसात झालेल्या दोन खुनांच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. पहिला खून जुन्या नांदेड शहरात झाला आहे. एका 23 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करुन खुन करण्यात आला आहे. तर दुसरा खून मिलगेट परिसरात संपादकावर तीक्ष्ण चाकूनं वार करून केला आहे. या दोन्ही खुनांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
यामध्ये पहिल्या घटने 23 वर्षीय अमोल साबणे याची हत्या करण्यात आली. ही घटना शुक्रवारी रात्री शहरातल्या देगलूर नाका भागात घडली. अमोल हा शुक्रवारी सकाळी शौचास पशुवैद्यकीय दवाखान्याच्या परिसरात गेला होता त्यानंतर तो परत आलाच नाही. रात्र झाली तरी तो परत न आल्यानं त्याचे मित्र आणि कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर अमोलचा मृतदेह एका झुडपात आढळून आला आहे. अज्ञात आरोपींनी त्याच्यावर धारदार शस्त्रानं वार करुन त्याचा खून केला. या प्रकरणी मृत अमोल याचा भाऊ श्याम साबणे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेतील मृताचे नाव प्रेमानंद जोंधळे असं आहे. शनिवारी रात्री 10 च्या सुमारास मिल गेट रस्त्यावर 35 वर्षीय प्रेमानंद जोंधळे भररस्त्यात चाकूनं भोसकून खून करण्यात आला. प्रेमानंद जोंधळे हे शहरातील सोमेश कॉलनी येथील रहिवासी होते. त्यांच्या घरासमोर कृष्णा हातागळे याचं घर आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या कुटुंबीयांचा वाद झाला होता. याच कारणातून कृष्णा हातागळे याने प्रेमानंद जोंधळे यांच्यावर चाकूनं सात ते आठ वार केले. यात प्रेमानंद यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. वजीराबाद पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…