Mahesh Babu's Brother Ramesh Babu Passes away
हैदराबाद : सुपरस्टार घटामनेनी कृष्णा यांचा मोठा मुलगा आणि महेश बाबू यांचा भाऊ अभिनेता घटमनेनी रमेश बाबू यांचे शनिवारी संध्याकाळी निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. अभिनेता महेश बाबू यांचा मोठा भाऊ रमेश बाबू यांचे हैदराबादमध्ये निधन झाले.
घटामनेनी रमेश बाबू (५६) हे यकृताच्या दीर्घ आजाराने त्रस्त होते. काही तासांपूर्वी त्यांची प्रकृती गंभीर झाली आणि त्यांना तातडीने गचीबोवली येथील एआयजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रमेश बाबू यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे.
रमेश बाबू यांच्या आकस्मिक निधनावर अनेक टॉलिवूड सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला. महेश बाबू यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली असून ते होम आयसोलेशनमध्ये आहेत. रमेश बाबू यांच्या अंत्यसंस्काराला ते उपस्थित राहू शकणार नाहीत. उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
रमेश बाबू यांनी 20 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. रमेश बाबूने बाल कलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि “चिन्नी कृष्णुडू” आणि “बाजार राउडी” सारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. ते नायक म्हणून फारसे यशस्वी होऊ शकले नाहीत. नंतर ते निर्माता झाले. त्यांनी “अर्जुन” आणि “अथिधी” या चित्रपटांची निर्मिती केली, ज्यात महेश बाबू नायक होते.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…