मनोरंजन

चित्रपट निर्माता हंसल मेहता यांच्या वडिलांचे निधन, हंसल मेहता झाले भावुक

मुंबई : चित्रपट निर्माता हंसल मेहता यांचे वडील दीपक सुबोध मेहता यांचे निधन झाले आहे. ही माहिती हंसल मेहता यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे दिली आहे. मात्र वडिलांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल हंसल मेहता यांनी कोणतीही माहिती दिली नाही. हंसल यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यांनी आपल्या वडिलांसाठी हृदयस्पर्शी नोट देखील लिहिली आहे.

हंसल मेहता यांनी लिहिले कि, “मला नेहमी वाटायचे की तुम्ही माझ्यापेक्षा जास्त काळ जगाल. पण, ती माझी चूक होती. मी तुम्हाला तिकडे भेटेन पप्पा. जगातील सर्वात देखणा माणूस. मला आजपर्यंत भेटलेला सर्वात शांत आणि दयाळू व्यक्ती. तुमच्या बिनशर्त प्रेमाबद्दल तुमचे आभार. धन्यवाद लेजंड, माझा हिरो.”

काही दिवसांपूर्वी हंसल मेहता यांच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली होती. ते सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago