Casting director-producer Seher Aly Latif passes away
मुंबई : बॉलिवूडपासून हॉलीवूडपर्यंतच्या चित्रपटात आणि वेब शोमध्ये कलाकारांच्या कास्टिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कास्टिंग डायरेक्टर सेहर अली लतीफ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सेहर लतीफ यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही आणि सोमवारी त्यांचे निधन झाले.
सेहर लतीफ यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सेहर लतीफ ‘लंच बॉक्स’, ‘मॉन्सून शूटआउट’, ‘शकुंतला देवी’, ‘दुर्गामती’, ‘मस्का’ यासारख्या चित्रपटांची तसेच ‘भाग बीनी भाग’ नावाच्या वेब शोची कास्टिंग डायरेक्टर होती. सेहर यांनी नेटफ्लिक्स फिल्म ‘मस्का’ आणि वेब शो ‘भाग बिनी भाग’ हे त्यांच्या प्रोडक्शन हाऊस ‘म्युटंट फिल्म्स’ अंतर्गत निर्मित केले होते.
सेहर लतीफ आंतरराष्ट्रीय स्तरावरील चित्रपट आणि वेब शोच्या कास्टिंगमध्ये मदत करण्यासाठी ओळखल्या जातात, ज्यात ‘ईट लव्ह प्राइ’, ‘फ्यूरियस 7’, ‘टायगर्स’, ‘व्हायसरॉयज हाऊस’, ‘मॅकमाफिया’, ‘सेन्स 8’ इ.चा समावेश आहे. ‘गोल्ड’, ‘शकुंतला देवी’ आणि ‘नोबेलमन’ सारख्या चित्रपटात कार्यकारी निर्माता म्हणूनही सेहर लतीफ यांचे नाव होते. सेहर लतीफ यांनी ‘मिलियन डॉलर आर्म’, ‘लाइन ऑफ डिसेंट’ अशा अनेक परदेशी चित्रपटांमध्ये भारतीय कलाकारांना कास्ट केले होते.
‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेत्री तरला जोशी यांचे निधन
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. अभिनेत्री निमरत कौर, राजकुमार राव, सान्या मल्होत्रा, ताहिरा कश्यप, नोरा फतेही, रोहित सराफ, अंगद बेदी, स्वरा भास्कर या सर्वांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…