मनोरंजन

बंगळुरूत पोलिसांची ड्रग रॅकेटवर कारवाई; अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिला अटक

मुंबईत शौविकला अटक तर बंगळुरूत क्राइम ब्रँचने आरटीओ क्लार्क रवीशंकर, इंटेरिअर डिझायनर राहुल, कन्नड अभिनेत्री रागिनी आणि पार्टी होस्ट विरेन या चौघांना अटक केली. विशेष म्हणजे मुंबईत अटक केलेले पाचजण सेलिब्रेटींना अंमली पदार्थ पुरवत असल्याचा संशय आहे. या प्रकरणात तपास सुरू आहे. आरोपींना एनडीपीएसच्या (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act – NDPS ACT) ज्या कलमांखाली अटक झाली आहे त्यात दोषी आढळल्यास ते दहा वर्षांसाठी जेलमध्ये जाण्याची शक्यता आहे. बंगळुरूतही चौघांना एनडीपीएसच्या कलमांखालीच अटक झाली आहे. या चौघांनाही शिक्षा झाल्यास दहा वर्षांसाठी जेलमध्ये जावे लागण्याची शक्यता आहे. या निमित्ताने बॉलिवूडमधील (Bollywood) अंमली पदार्थांच्या व्यवहारांशी संबंधित नवी माहिती उजेडात येईल, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

शौविक आणि सॅम्युअल या दोघांना शनिवारी कोर्टासमोर हजर केले जाईल. दोघांविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत (Narcotic Drugs and Psychotropic Substances Act – NDPS ACT) कलम ८ क, २० ब, २७ अ, २८ आणि २९ आधारे आरोप ठेवले आहेत. यात दोषी आढळल्यास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. सॅम्युअल मिरांडा आणि शौविक चक्रवर्ती विरोधात एनसीबीने अंमली पदार्थांच्या खरेदी-विक्रीचे आर्थिक व्यवहार केल्याचा ठपका ठेवला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 आठवडा ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

2 आठवडे ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

2 आठवडे ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

3 आठवडे ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago