मनोरंजन

एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला केली अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनसंबंधी एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला अटक केली आहे. सॅम्यूअल मिरांडा यालादेखील एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

एनसीबीने आज गांजा व्यापारी जैसेन, सुशांतचा मॅनेजर सॅम्युल मिरांडा आणि रियाचा भाऊ शोविक याला चोकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर अनेक तासांच्या चौकशीनंतर एनसीबीने शोविकला अटक केली. यापूर्वीही गांजा बाळगल्याप्रकरणी एनसीबीने चौघांना अटक केली होती. त्यामध्ये पहिली अटक अब्बास रमझान अली याची झाली. त्याच्याकडे 46 ग्राम गांजा मिळाला. त्याने कर्ण अरोरा यांच्याकडून घेतल्याचं सांगितल्यावर एनसीबी ने पवईतून कर्ण अरोरा याला अटक केली. त्याच्याकडे 13 ग्राम गांजा मिळाला. यांच्या चौकशीत झैद विलात्रा याच नाव पुढे आल्याने त्याला ही 2 सप्टेंबरला अटक केली.

झैद याच्याकडे मोठ्या प्रमाणात भारतीय चलन आणि परदेशी चलन सापडलं होतं. चौकशीत त्याने अनेकांची नाव उघड केली. झैद याने अबीद बसिद परिहार हा देखील गांजा विक्रीच्या व्यवसायात सक्रिय असल्याचं सांगितल्याने अबीद याला ही अटक करण्यात आली. अबीदने आपण हा गांजा शोविक याच्या सांगण्यावरुन विकत घेऊन सॅम्युल मिरांडाला देत होतो, असं सांगितलं आहे. यावेळी शोविक याचं नाव आल्याने त्याला आणि मिरांडा या दोघांना एनसीबी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago