महाराष्ट्र

महाविकास आघाडीने एक ऐतिहासिक अर्थपूर्ण निर्णय घेतल्याचा आरोप – आमदार सुजितसिंह ठाकूर

महाविकास आघाडीने एक ऐतिहासिक ‘अर्थपूर्ण’ निर्णय घेतल्याचा आरोप विधान परिषदेतील भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केला. पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

उस्मानाबाद पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता हे पद रिक्त ठेवण्याचा निर्णय झाला. जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे ६ कार्यकारी अभियंता असताना हा निर्णय झाला. नंतर एकदम उस्मानाबादपासून ३०० किमी दूर असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील उर्ध्व प्रवरा धरण विभाग, संगमनेर येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे उस्मानाबादच्या रिक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. सरकारचा हा निर्णय नियमबाह्य आणि अनाकलनीय आहे. हा निर्णय घेण्यामागे नेमका काय ‘अर्थ’ दडला आहे?, असा जळजळीत सवाल आमदार सुजितसिंह ठाकूर उपस्थित केला. राज्याच्या इतिहासात हा प्रकार पहिल्यांदाच झाल्याचाही आरोप त्यांनी केला.

आमदार सुजितसिंह ठाकूर पुढे म्हणाले की, मराठवाड्यातील विशेषत: उस्मानाबाद जिल्ह्यातील कायम दुष्काळी व अवर्षणप्रवण भागातील शेती सिंचनसाठी महत्त्वाकांक्षी असलेला कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ याच कार्यालयांतर्गत येतो. हा प्रकल्प जिल्ह्याच्यादृष्टीने महत्वाकांक्षी तसेच अत्यंत जिव्हाळ्याचा असताना सत्ताधाऱ्यांनी इतकी उदासीन वृत्ती का दाखवली हा मोठाच प्रश्न असल्याचे सांगून आमदार ठाकूर म्हणाले की, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प हा अनेक बाबींमुळे बर्‍याच वर्षापूर्वी जवळपास रद्दबातल ठरला होता. देवेंद्र फडणवीस सरकारमुळे इतक्या मोठ्या प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्रच नव्हते. जे प्रकल्पाचा मूळ आराखडा करतानाच हवे होते. ते मिळाले. केंद्रीय पर्यावरण विभागाची मान्यता नव्हती. ती नाकारून केंद्राने कारवाई प्रस्तावित केली होती. ती मिळाली. कृष्णा पाणी वाटप तंटा लवादाची पाणी मान्यता नव्हती. ती पहिल्या टप्प्यात ७ टीएमसी पाणी मान्यता मिळाली. राज्यपालांच्या निधीसूत्राबाहेर निधी दिला. निधीची कसलीच तरतूद नसलेल्या बोगद्यांच्या कामांना निधी उपलब्ध करून देऊन नीरा भीमा आणि जेऊर बोगद्यांची कामे गतीने सुरू केली. जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या मात्र रद्दबातल ठरलेल्या प्रकल्पाचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्यामुळेच पुनर्जीवन होऊन ठप्प झालेल्या प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकले. या आमच्या जिव्हाळ्याच्या प्रकल्पाबाबतीत महाविकास आघाडी सरकारची आता तर उदासीनताच अधोरेखित झाली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago