मनोरंजन

प्रसिद्ध सितारवादक देबू चौधरी यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रतीक चौधरी यांचे कोरोनाने निधन

प्रख्यात सितारवादक प्रतीक चौधरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. गेल्या आठवड्यातच त्यांचे वडील आणि संगीतकार पंडित देवब्रत चौधरी यांचे कोरोना संसर्गाने निधन झाले होते. 49 वर्षीय प्रतीक चौधरी यांच्यावर दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु, गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

संगीत इतिहासकार पावन झा यांनी ट्विटरद्वारे ही बातमी शेयर केली. ते म्हणाले कि, “प्रतीक चौधरी यांचे निधन झाले आहे. तो प्रख्यात संगीतकार आणि प्रतिभावान कलाकार देबू चौधरी यांचा मुलगा होता. तो आयसीयूमध्ये जीवन-मृत्यूशी संघर्ष करत होता. आता तो त्याच्या वडिलांकडे निघून गेला आहे. त्याच्या दिवंगत आत्म्याला शांती लाभो.”

ते पुढे म्हणाले, “त्याची तब्येत सुधारत होती. देबूजी सोबतच त्याला जीटीबी रुग्णालयात दाखल केलं होतं. सोमवारी जेव्हा त्याला रुग्णालयातून सोडण्यात आलं तेव्हा मी त्याच्याशी शेवटचं बोललो होतो. परंतु वडिलांच्या निधनाच्या बातमीने तो पूर्णपणे तुटला होता. हे खूप वाईट आहे.”

प्रसिद्ध सितार वादक देवब्रत चौधरी हे देबू चौधरी म्हणून लोकप्रिय होते. गेल्या आठवड्यात शनिवारी त्यांचे निधन झाले. प्रतीक चौधरी हे संगीताच्या सेनिया घराण्यातून होते. ते दिल्ली विद्यापीठात संगीत, संगीत आणि ललित कला विद्याशाखा विभागातील प्राध्यापक होते. प्रतीक यांच्या पश्चात पत्नी रुना आणि मुले रायना व अधिराज आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago