शैक्षणिक

अंतिम वर्षातील ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक गोंधळ, परीक्षा पुढे ढकलल्या

नागपूर : मुंबई विद्यापीठातील परीक्षेत काही दिवसांपूर्वी तांत्रिक गोंधळ पाहायला मिळाला होता. त्यानंतर आता नागपूर विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षेदरम्यान तांत्रिक गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता आली नाही. यामुळे त्या विषयाची परीक्षा नंतर घेतली जाईल, असे परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केले आहे.

नागपूर विद्यापीठाची ऑनलाईन परीक्षा 8 ऑक्टोबरपासून सुरु झाली. काल 9 ऑक्टोबरला डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट या विषयाचा पेपर आयोजित करण्यात आला होता. मात्र विद्यापीठाच्या ऑनलाईन अॅपचं सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. यानंतर ही परीक्षा पुढे ढकललण्यात आली आहे.

Technical confusion during final year online exams, exams postponed

दरम्यान, मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला होता. त्यामुळे ऐन परीक्षेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने 6 ऑक्टोबर आणि 7 ऑक्टोबर 2020 रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर आणि आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जातील, अशी माहिती मुंबई विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी दिली होती.

दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या अंतिम वर्षाच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या परीक्षेला 3 ऑक्टोबर 2020 पासून सुरुवात झाली होती. या परीक्षेच्या दुसऱ्या पेपरला हा सायबर हल्ला झाला. त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्याने हे पेपर पुढे ढकलण्यात आले होते. 7 ऑक्टोबर 2020 रोजी होणाऱ्या परीक्षा तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, तृतीय वर्ष बीएस्सी आयटी सत्र 6 आणि बॅकलॉगच्या परीक्षा प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम, एमसीए सत्र 1 व सत्र 2 या परीक्षाचे पेपरही पुढे ढकलण्यात आले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

5 दिवस ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

5 दिवस ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

5 दिवस ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

5 दिवस ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

3 आठवडे ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

3 आठवडे ago