देश

कोरेगाव भीमा प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना अटक

१ जानेवारी २०१८ रोजी पुण्याच्या कोरेगाव भीमा गावात दलित आणि मराठा समाजामध्ये हिंसाचार उफाळला होता. या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएच्या टीमनं ८३ वर्षीय फादर स्टॅन स्वामी यांना झारखंडमध्ये नामकुम स्टेशन हद्दीत येणाऱ्या बगईंचा स्थित त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं. आज (शुक्रवारी) स्वामी यांना न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

फादर स्टॅन स्वामी यांना रिमांडवर घेतलं जाऊ शकतं किंवा ट्रान्झिट रिमांडवर त्यांना दिल्लीला आणलं जाऊ शकतं. स्वामींच्या अटकेची माहिती एनआयएकडून झारखंड पोलिसांनाही देण्यात आलेली नव्हती. स्वामींची या अगोदर २७-३० जुलै आणि ६ ऑगस्टलाही एनआयएकडून चौकशी करण्यात आली होती. माओवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप स्वामी यांनी फेटाळले होते.

मूळचे केरळचे असणारे आणि सामाजिक कार्यकर्ते अशी ओळख असलेले फादर स्टॅन स्वामी जवळपास पाच दशकांपासून अधिक काळ झारखंडमध्ये आदिवासींसोबत काम करत आहेत. त्यामुळेच स्टॅन स्वामींच्या अटकेचा निषेधही करण्यात येतोय. कोरेगाव भीमा प्रकरणात आत्तापर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना आणि विचारवंतांना अटक करण्यात आलेली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago