Uday Samant
अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी पूर्वी असलेली गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे. तसेच सुधारित गुणांच्या अटीनुसार पुढील प्रवेश होणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या पात्रतेच्या निकषांमध्ये यंदा बदल करण्यात आल्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता येण्यास मदत होणार आहे. बारावीचे पात्रता गुण पाच टक्क्यांनी कमी केले आहेत. याचा फायदा असंख्य विद्यार्थ्यांना होणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी बारावीला विज्ञान विषयांमध्ये (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा जीवशास्त्र) किमान ५० टक्के गुण मिळणे आणि प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) देणे आवश्यक होते. आता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बारावीला ४५ टक्के गुण पुरेसे आहेत. तर राखीव गटांसाठी ४० टक्के गुण पुरेसे ठरणार आहेत.
या निर्णयामुळे बारावीला खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४५ टक्के गुण व मागासवर्गीय वर्गातील विद्यार्थ्यांना किमान ४०% असतील तर ते आता अभियांत्रिकी प्रवेशासाठी पात्र होऊ शकणार आहेत, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…