Bank transactions will now become more expensive, RBI approves rate hike
मुंबई : एटीएममधून आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे महाग होणार आहे. आरबीआयचे हे नवीन नियम उद्यापासून म्हणजे 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. आरबीआयने सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक व्यवहारांवरील इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक म्हणजे नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली आहे.
सध्या मेट्रो शहरात महिन्याला तीन ट्रान्झॅक्शन आणि इतर शहरात पाच ट्रान्झॅक्शन फ्री देण्यात येतात. त्यानंतरच्या ट्रान्झॅक्शनवर पैसे आकारण्यात येतात. फायनान्शियल ट्रान्जेक्शन म्हणजे पैसे काढणे, किंवा पैशाचा व्यवहार करणे होय तर नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शन म्हणजे आपल्या खात्यावरील बॅलेन्स चेक करणे किंवा तशा प्रकारची कामे करणे.
आयसीआयसीआय बॅकेंच्या महिन्यातील पहिल्या चार ट्रान्झॅक्शनवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत तर पाचव्या ट्रान्झॅक्शनसाठी 150 रुपये आकारले जाणार आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…