अर्थकारण

ATM मधून पैसे आलेच नाहीत, तर RBI कडे ‘या’ क्रमांकावर करू शकता तक्रार

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएमसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने म्हटले आहे की ज्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील, त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड आकारला जाईल. या परिस्थितीत ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर किंवा फोन नंबर 011-23711333 वर कॉल करून तक्रार करू शकतात.

देशातील सर्वात मोठ्या बँकेने व्हाईट लेबल एटीएम ऑपरेशनसाठी नियम जारी केले आहेत. WLAO कंपन्यांच्या माध्यमातून ATM मध्ये पैसे टाकले जातात. RBI ने सूचना दिल्या आहेत की ATM मध्ये पैसे संपणार नाहीत याची बँकांना काळजी घ्यावी लागेल. नियम न पाळणाऱ्या बँकेकडून दंड आकारला जाईल. हा नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणार आहे.

आरबीआयचे निर्देश

आरबीआयने म्हटले आहे की एटीएममध्ये पैसे संपणार नाहीत, याची खात्री बँकांना करावी लागेल. यासाठी बँका आणि डब्ल्यूएलएओला वॉच ठेवावा लागेल. पैसे संपल्यानंतर एटीएममध्ये रोख रक्कम लवकरात लवकर जमा करावी, जेणेकरून जनतेला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. अन्यथा ग्राहक रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकतो.

जर बँकेला किंवा डब्ल्यूएलएओला दंडाच्या विरोधात अपील करायचे असेल तर क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. यासाठी एक महिन्याच्या आत अपील दाखल करावे लागेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago