अर्थकारण

ग्राहकांना मोठा धक्का..! अ‍ॅक्सिस बँकेचे व्यवहार आता महागणार, अनेक नियमांत मोठे बदल..

नवी दिल्ली : आपण अ‍ॅक्सिस बँकेचे ग्राहक असाल तर आपल्यासाठी ही खूप महत्वाची बातमी आहे. आता अ‍ॅक्सिस बँकेतून पैसे काढणे महाग होणार आहे. बँकेने बचत खात्यातून रक्कम काढण्यावरील आणि SMS शुल्क वाढविले आहे. नवीन दर 1 मे 2021 पासून लागू होतील.

वृत्तानुसार, 1 मे 2021 पासून अ‍ॅक्सिस बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यात सरासरी किमान मासिक 15,000 रुपये शिल्लक ठेवावे लागतील. सध्या ही मर्यादा 10,000 रुपये आहे. याशिवाय बँकेने प्राइम आणि लिबर्टी बचत खात्यात सरासरी किमान शिल्लक मर्यादा 15,000 रुपयांवरून 25,000 रुपयांपर्यंत वाढविली आहे.

किमान शिल्लक नसल्यास :

अ‍ॅक्सिस बँक आपल्या बचत खाते धारकांना एका महिन्यात 4 व्यवहार किंवा 2 लाख रुपये विनामूल्य काढण्यास परवानगी देते. यानंतर रोख रक्कम काढल्यावर प्रति हजार 5 रुपये किंवा जास्तीत जास्त 150 रुपये घेतात. आता बँकेने विनामूल्य व्यवहारानंतर लागणारे 5 रूपये शुल्क वाढवून 10 रुपये केले आहे. तथापि, जास्तीत जास्त 150 रुपये शुल्क कायम ठेवण्यात आले आहे. म्हणजेच किमान शिल्लक न ठेवल्यास बँक 50 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत शुल्क आकारेल.

SMS चार्ज देखील वाढले

याशिवाय आता बँक प्रति एसएमएसवर 25 पैसे आकारेल. सध्या यासाठी दरमहा 5 रुपये आकारतात. हा नवीन दर 1 जुलै 2021 पासून लागू होईल. यात ओटीपी आणि बँकेने पाठविलेला प्रचारात्मक SMS (promotional SMS) समाविष्ट असणार नाही.

वेतन खात्याच्या (सॅलरी अकाउंट) नियमात बदल : 

अ‍ॅक्सिस बँकेने वेतन खात्याचे नियमही बदलले आहेत. जर आपले वेतन खाते 6 महिन्यांपेक्षा जुने असेल आणि कोणत्याही एका महिन्यात काही क्रेडिट नसेल तर दरमहा 100 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच जर आपल्या खात्यात 17 महिन्यांपर्यंत व्यवहार झाला नसेल तर 18 व्या महिन्यात 100 रुपये शुल्क आकारले जाईल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago