क्राईम

प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तरुणाने केली स्वतःच्या आईची हत्या

हरियाणा : प्रेमप्रकरणाच्या संशयावरून तरुणाने आपल्याच विधवा आईचा चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुलाने आईची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह पलंगाखाली लपवून ठेवला आणि तिचा मोबाईल घेऊन पळ काढला. पोलिसांनी आरोपी मुलाला रोहतक येथून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आई बराच वेळ मोबाईलवर बोलत असल्याने आरोपीला वाटत होते की त्याच्या आईचे कोणाशी तरी अफेअर आहे. एसीपी क्राइम प्रीतपाल सांगवान यांनी सांगितले की, आरोपी मुलाने 6 ऑगस्ट रोजी रात्री जेवण केल्यानंतर संशयावरून आईवर चाकूने हल्ला केला आणि त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह खोलीतील पलंगाखाली लपवून ठेवला आणि खोलीला बाहेरून कुलूप लावून फरार झाला. 10 ऑगस्टच्या रात्री खोलीतून दुर्गंधी येऊ लागली, त्यावरून पोलिसांना माहिती देण्यात आली.

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, मात्र खोलीला बाहेरून कुलूप होते. खोलीचा दरवाजा तोडला असता पलंगाखाली मृतदेह पडलेला दिसला. या प्रकरणी मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून सेक्टर-10 ए पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही तासांतच 21 वर्षीय मुलाला अटक केली. त्याच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेला चाकू, खोलीच्या बाहेरील कुलूपाची चावी, घटनेच्या वेळी परिधान केलेले कपडे आणि मृत महिलेचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने चौकशीदरम्यान खुलासा केला की त्याची आई रात्री उशिरापर्यंत फोनवर बोलत असायची आणि त्यामुळे त्याला आईवर संशय होता. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

1 महिना ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

1 महिना ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

1 महिना ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 महिना ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 महिने ago