क्राईम

30 वर्षीय महिलेवर दिल्ली रेल्वे स्टेशनवर सामूहिक बलात्कार, चार रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक

नवी दिल्ली : दिल्ली रेल्वे स्टेशनवर एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रेल्वेच्या चार कर्मचाऱ्यांवर महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे, हे सर्व कर्मचारी वीज विभागात काम करतात. दिल्ली पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, घटनेच्या वेळी सर्व आरोपी दारूच्या नशेत होते. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

डीसीपी रेल्वे हरेंद्र सिंह यांनी सांगितले की, 30 वर्षीय पीडितेवर गुरुवारी रात्री रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म 8-9 वर इलेक्ट्रिकल मेंटेनन्स कर्मचाऱ्यांच्या खोलीत बलात्कार झाला. चारही आरोपी विद्युत विभागातील रेल्वे कर्मचारी असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सतीश, मंगल, विनोद आणि जगदीश अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी 30 ते 35 वर्षे वयोगटातील असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करून कारवाई सुरू करण्यात आली आहे.

पीडितेची काही काळापूर्वी एका आरोपीशी मैत्री झाल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी रात्री एका आरोपीने पीडितेला काही बहाण्याने नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर बोलावले. त्यानंतर आरोपींनी तिला नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ८/९ वरील एका खोलीत नेले. ही खोली प्लॅटफॉर्मवरील फूट-ओव्हर ब्रिजच्या खाली विद्युत विभाग आणि इतर विभागांच्या वापरासाठी बांधली आहे, ज्यामध्ये काही प्रकारची उपकरणे देखील आहेत. मुख्य आरोपीने आणखी तीन लोकांना तिथे बोलावून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे सांगण्यात येत आहे.

या प्रकरणात दोन जणांचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे सांगितले जात होते, परंतु इतर दोघांनाही त्यांची साथ दिल्याच्या आरोपावरून पोलिसांनी अटक केली आहे. सामूहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, सामूहिक बलात्काराच्या घटनेतील मुख्य आरोपी रेल्वेचा असल्याची माहिती जीआरपीला मिळाली, त्यामुळे लगेचच स्टेशन पोलिसांनी पहिल्या मुख्य आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर या घटनेत सहभागी असलेले अन्य तीन आरोपीही रेल्वे कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर इतर फरार आरोपींना पकडण्यासाठी जीआरपीने अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यानंतर अन्य तीन फरार आरोपींनाही अटक करण्यात आली. चौघांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

स्वातंत्र्यदिनानिमित्त डॉ. सोमनाथ गिते यांचा महापौरांच्या हस्ते गौरव

पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…

16 तास ago

लग्न ठरलेल्या प्रियकरासोबत तरुणीचा संशयास्पद मृत्यू; आईचा गंभीर आरोप

बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…

6 दिवस ago

चार महिन्यांपूर्वीचा नवाकोरा रस्ता ऑप्टिकल फायबरसाठी फोडला; राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांचा संताप; काम बंद पाडून अधिकाऱ्यांना जाब

नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…

7 दिवस ago

‘उघडलेले पुस्तक’ पॅनेलचा दणदणीत विजय; सर्व १५ उमेदवार विजयी; सर्व प्रवर्गांत परिवर्तन आणि सुशासन पॅनेलला यश

पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…

1 आठवडा ago

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

3 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

3 महिने ago